माना/अकोला प्रतिनिधी
आशिष वानखड़े
माना परिसरात व माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास महिला आणि बाल विकास विभागाच्या चाईल्ड लाईन व ' एस एस टू जस्टीस ' यांच्या सहकार्याने माना पोलिसांना बालविवाह रोखण्यासाठी यशस्वी झेप घेतली.
प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार माना पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या चाईल्ड लाईन व एस एस टू जस्टीस या प्रकल्पाने महत्त्वाची भूमिका बजावून बालविवाह रोखण्यास यशस्वी झेप घेतली असून बालकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर सकाळी मिळालेल्या अज्ञात फोन कॉल वरून यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह माना पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या हद्दीत एका गावात या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असा फोन कॉल चाइल्ड लाईनला मिळाला. या फोन कॉल वरून चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये आणि एस एस टू जस्टीस चे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या सहकार्याने या कारवाईस सुरुवात करण्यात आली. पोलिसांचा सर्व ताफा हा लग्न मंडपात पोहोचून. लग्नाचे पूर्ण तयारी झाली असल्याचे पाहून या लग्न मंडपात दोनशे ते तीनशे लग्न लावण्याकरिता वर आणि वधू कडील मंडळी जमले होते. आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा तयार होती. परंतु पोलिसांचा हा ताफा तेथे पोहोचल्याने लग्नात उपस्थित असलेल्या वधू-वरां कडील सर्व पक्षाचे धाबे दणाणले. वधूच्या पालकांना ही बातमी कळताच वधू समवेत पालकही लग्न मंडपातून फरार झाले. नंतर नवरदेव पक्षाला बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बाबत माहिती देण्यात आली. वधू व वर पक्षाला समुपदेशन करून माहिती देण्यात आली. ग्राम विकास अधिकारी भगत यांनी वधू वर पक्षाच्या पालकांना नोटीस बजावून त्यांना व पालिकेला बालकल्याण समिती अकोला येथे उपस्थित राहण्याचे सुद्धा आदेश दिले. वर वधु पक्ष हे दोन्ही पक्ष अकोला येथे बालकल्याण समिती समोर उपस्थित झाले. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्र लेखी स्वरूपात त्यांनी घेतले. यावेळी ग्रामसचिव, सरपंच, पोलीस पाटील, व अंगणवाडी सेविका यांची साक्ष नोंदविण्यात आली. या संपूर्ण कारवाई जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजीव लाडुलकर, यांचे मार्गदर्शन सुद्धा लाभले. त्याचप्रमाणे माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरवशे, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरोदे, व पोलीस कॉन्स्टेबल जावेद खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments