Type Here to Get Search Results !

कत्तलीसाठी नेत असलेल्या चाळीस गोवंशांना माना पोलिसांनी दिले जिवनदान




 *माना पोलिसांची कौतुकास्पद कारवाई. पोलिसांनी गोरक्षण मध्ये जनावरे सोडून दिले*


 माना/अकोला 

आशिष वानखडे


 माना व परिसरात दिवसेंदिवस अवैद्य कत्तलीसाठी नेत असलेले जनावरांचे हाल सुरूच असून आणखी भर म्हणजे भर दिवसा दुपारी अकरा वाजून 45 मिनिटांच्या सुमारास चाळीस गोवंशांना माना पोलिसांनी जीवनदान देऊन हे कार्य कौतुकास्पद केल्याची घटना 11 मे रोजी घडली.

 पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार ईदगाह प्लॉट माना येथे आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद वय 30 वर्ष राहणार माना तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला. याने अतिशय निर्दयपणे जनावरांची कत्तल करण्याकरिता चाळीस गोवंश हे झाडाला बांधून ठेवले होते. या गोवंशंपैकी 28 गाई, आणि बारा बैल, या सर्व जनावरांना ईदगाह प्लॉट येथे बांधून ठेवले होते. अशी गुप्त माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांना मिळाली. ठाणेदार यांनी क्षणाचाही विलंब नकरता तातडीने पोलीस ताफ्यासह ईदगाह प्लॉट येथे धाड टाकून 28 गाई आणि बारा बैल हे झाडांना बांधून ठेवल्याचे दिसले. यावर अल्फाब अहमद मुमताज अहमद वय तीस वर्षे राहणार माना याला आपला पोलिसी खाक्या दाखविला असता तो पोपटाप्रमाणे बोलू लागला व हे सर्व कत्तलीसाठी आणलेले जनावरे हे त्याने कबूल केले.

 यावरून आरोपी अल्फाब अहमद मुमताज अहमद याला माना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 28 गाई आणि बारा बैल एकूण चार लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दाखल अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मंगेश इंगोले.वं फिर्यादी म्हणून सुरज संभाजी सुरोशे. यांनी काम पाहिले.

 माना पोलिसांनी १२५/२०२५ कलम ५, ५ब ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सह कलम ११(१)क ११(च) प्राण्यांनी निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 गुन्हा नोंद केला असून सदरचे कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे, पोलीस हवालदार राजेश डोंगरे, पोलीस हवालदार उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले, पोलीस कॉन्स्टेबल ललित वनचरे, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डाबेराव यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments