नांदुरा. देवेंद्र जैसवाल
आज दिनांक 12/05/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा कडून अवैध दारू व जुगार विरुद्ध करण्यात आलेली कारवाई माहिती खालील प्रमाणे...
दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई..
1. खूमगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राजेश हरसिंग डाबेराव वय 40 वर्ष राहणार खुमगांव तालुका नांदुरा याचे वर मिळालेल्या माहितीवरून दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 10 नग शिशा किमती 550 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच
2. जनता चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे संदीप मारुती सातव वय 36 वर्ष राहणार चांदुर बिस्वा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 30 नग शीशा किमती 1100 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जुगार कायद्यांतर्गत कारवाई...
1. ग्राम निमगाव बस स्थानक येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सदाशिव लक्ष्मण चोपडे वय 50 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच
2. ग्राम निमगाव बस स्थानक येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गणेश चंद्रभान महाले वय 36 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच
3. ग्राम निमगाव येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे विनोद मधुकर मानकर वय 36 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून जुगाराची नगदी व इतर एकूण मुद्देमाल किमती 550 रुपये चा जप्त करण्यात आला.
4. ग्राम निमगाव येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गोपाल तुकाराम बोचरे वय 37 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही ठाणेदार विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे Asi मिलिंद जवंजाळ,पोहे का काशिनाथ जाधव, गजानन इंगळे, संजय वराडे, पोका विनायक मानकर, विनोद भोजने, सुनील सपकाळ यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments