Type Here to Get Search Results !

कास्तकारी हे कठिन काम.आमच्या जिवाला नसें आराम जरी मातीत आटवल रक्त .तरी शेतकरीला मिळेना न्याय

उप संपादक -*-आशिष वानखडे

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेचे झुंझार कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निवेदन देताना...


खरीप 2024 मध्ये झालेल्या पावसामुळे आडगाव मंडळ मध्ये पिकाचे प्रचंड नुकसान झाले...

शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली मालठाना बु , मालठाना खुर्द ची सक्षम अधिकाऱ्याने अतिवृष्टी ची मदत यादी तयार करून ग्राम पंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध सुद्धा केली..

परंतु ग्राम महसूल अधिकारी यांनी ती प्रसिद्ध केलेली यादी तहसील कार्यालय येथे सादर न करता..

हेतुपुरस्पर काही शेतकऱ्यांची मदत कमी करून व मर्जीतील शेतकऱ्यांची मदत वाढवून दुसरीच यादी बनवून शासन दरबारी सादर केली...

त्यामुळे येथील शेतकऱ्यांनवर अन्याय केला 

व संबधित अधिकाऱ्याने आर्थिक देवाण घेवाण करून यादीत घोळ केला काय अशी शेतकऱ्यांना शंका आहे?

त्याकरिता शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्वी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार मदत शेतकऱ्यांना मिळावी व संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले..

त्यावेळी शेतकरी संघटनेचे अमोल मसुरकर, निलेश नेमाडे, रितेश देशमुख,राहत खा, अनिल मानकर शैलेश गहरवार,विलास इंगळे,जकिर हुसेन मनोज नेमाडे, असंख्य शेतकरी उपस्थित होते..

व न्यान न मिळाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला

Post a Comment

0 Comments