अकोटफाइल पोलिस स्टेशन हदतील चालणारे गोवंश चोरी व मांसाची विक्रीवर कारवाई करा; भाजप अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
अकोला । अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली गोवंशाची चोरी व गोवंशाच्या मांस विक्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप महानगर अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मो. शाहरुख मो. शकील व सरचिटणीस जाकीर खाँ बिस्मिल्ला खान यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या व गोवंश मांसावर बंदी आणल्यानंतरही काही समाजकंटक आणि कायद्याला ठेंगा दाखवणारे लोक बिनधास्त गैरप्रकार करत आहेत. अकोटफाइल पोलिस स्टेशन परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांकडून आठवड्याला पैसे वसूल करणारे पोलिस कर्मचारी, गायी चोर आणि तस्कर हे त्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला लाखो रुपये देऊन उघडपणे चोरी आणि तस्करी करत आहेत आणि आतापर्यंत त्या चोरांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. अकोटफाइल पोलिस गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहेत.
गोमांस विक्री करणाऱ्या टोळ्यांची दिवसागणिक हिंमत वाढत चालली आहे, अशी त्यांनी तक्रार दिली आहे.


Post a Comment
0 Comments