लेखिका: उमा ताई बोचरे, महिला जिल्हाध्यक्षा – समाजवादी पार्टी
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या गावात जन्मलेला आणि वाढलेला एक तरुण – ही त्याच्या अधःपतनाची कहाणी आहे. हा लेख कुणाच्याही वैयक्तिक बदनामीसाठी नसून, समाजात अशा प्रवृत्तींकडून स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण कसं करावं, याचे भान ठेवण्यासाठी लिहिलेला आहे.
बेरोजगारीपासून गुन्हेगारीकडे
हा तरुण सुरुवातीला शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार होता. हातात काम नव्हते, त्यामुळे रिकामपणाच्या काळात तो गावात वाईट संगतीला लागला. दोन नात्यांमध्ये भांडण लावणे, गावातील वृद्ध महिलांशी अश्लील वर्तन करणे यासारख्या वागणुकीने त्याने आपली पत गमावली.
शेवटी तो चोरी आणि लुटमारीच्या मार्गावर गेला. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि चांगला धडा शिकवून जिल्ह्यातून हाकलले. जामिनावर सुटल्यानंतर त्याला गावात राहणं अशक्य झालं. लोकांचा रोष आणि समाजाची भीती यामुळे तो मुंबईला जाऊन राहू लागला.
पत्रकारितेच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा
मुंबईत जाऊन त्याने एका स्थानिक दैनिकाची सुरूवात केली. पण ही पत्रकारिता समाजाच्या भल्यासाठी नव्हती. ही पत्रकारिता होती – ब्लॅकमेलिंगचा एक मुखवटा!
ज्यांनी त्याच्या वाईट काळात साथ दिली, त्याच लोकांना तो पैसे मागून धमकावू लागला. पैसे न दिल्यास खोट्या आरोपांमध्ये गुंतवून त्यांचे फोटो आणि बनावट बातम्या पेपरमध्ये छापून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सर्रास सुरू झाला.
अशा प्रवृत्तींना विरोध हवा
समाजामध्ये अशी लोकं पत्रकारितेच्या पवित्र व्यवसायाची बदनामी करतात. खरे पत्रकार हे सत्याची बाजू घेणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे असतात. पण काहीजण हेच माध्यम स्वतःच्या स्वार्थासाठी, खंडणीसाठी वापरतात.
समाजाने सजग राहावे
अशा लोकांची खरी ओळख समाजाने वेळेत ओळखली पाहिजे. त्यांच्या दिखाव्याच्या आड लपलेल्या खऱ्या चेहऱ्याकडे बोट दाखवणे, हे आपल्या समाजाचं कर्तव्य आहे.
स्त्री म्हणून, एका राजकीय कार्यकर्त्या म्हणून, आणि समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या व्यक्ती म्हणून मी हे नम्रपणे आवाहन करते – अशा भोंदू पत्रकारांपासून सावध राहा. सामाजिक एकतेत फूट पाडणाऱ्या, खोटारडे आरोप करणाऱ्या, आणि निष्कलंक लोकांना बदनाम करणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक बहिष्कार केला पाहिजे.
---
लेखिका:
उमा ताई बोचरे
महिला जिल्हाध्यक्षा – समाजवादी पार्टी
.

Post a Comment
0 Comments