नांदुरा.प्रतिनीधी.
आज दिनांक 28/05/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, पंचवटी नांदुरा खुर्द येथील ग्राउंडवर मोकळ्या जागेत काही लोक पैशाच्या हार जीतवर तितली भवरा नावाचा जुगाराचा खेळ खेळत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून जुगार रेड करून आरोपी नामे 1. हुसेन शहा मोहम्मद शहा वय 45 वर्ष राहणार पेठ मोहल्ला नांदुरा 2. शेख युसुफ शेख मोहम्मद गैबी नगर नांदुरा यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नगदी व तिथली भवरा बोर्ड एकूण किमती 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण(DB) पथकाने केली आहे.

Post a Comment
0 Comments