नांदुरा प्रतिनिधी.देवेंद्र जैस्वाल
दिनांक 21/05/2025 रोजी मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये दारू ,जुगार व सिगारेट व इतर तंबाखूजन उत्पादने अधिनियम अन्वये करण्यात आलेली कारवाई माहिती खालीलप्रमाणे.....
➡️ दारूबंदी कायद्यांतर्गत केलेली कारवाई....
1. रामनगर नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे रुखमाबाई प्रेमकुमार काळे वय 55 वर्ष राहणार रामनगर नांदुरा हिचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून हिचे ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 ml च्या 20 नग किमती 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
2. रामनगर नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुनिकेत एकनाथ फिरके व 24 वर्ष राहणार रामनगर नांदुरा याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 25 नग शीशा किमती 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
➡️ जुगार कायद्यांतर्गत कारवाई....
1. घास मंडी नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मोहसीन खान रशीद खान वय 37 वर्ष राहणार सोफी बाग नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
2. ग्राम निमगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गणेश चंद्रभान महाले वय 36 वर्ष रा निमगाव तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
3. ग्राम निमगाव येथे गजानन मंदिर समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे विठ्ठल सुरेश काटकर वय 28 वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
4. ग्राम वडनेर भोलजी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सागर बबन इंगळे वय 28 वर्ष राहणार भीमवाडी वडनेर भोलजी याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
5. सकलाबाद शेत शिवार तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे 1. सोपान हरिभाऊ छोटे वय 45 वर्ष 2. संदीप दशरथ देऊन आले व 23 वर्ष 3. निंबाजी रमेश बावस्कर 4. रामेश्वर एकनाथ वानखडे 5. पिना दांडगे सर्व राहणार निमगाव तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 2,11,060/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
➡️ सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम अन्वय करण्यात आलेली कारवाई.....
1. नांदुरा खुर्द येथे मराठी शाळेच्या जवळ मिळालेल्या गुप्त माहिती वरून आरोपी नामे संदीप श्रीराम लाहुडकार वय 37 वर्ष राहणार वार्ड नंबर 18 नांदुरा खुर्द याच्याविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 प्रमाणे कारवाई करून त्याचे ताब्यातून सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने एकूण किमती 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी विरुद्ध कोपटा कायदा 6 (b),24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
➡️आज रोजी दारूबंदी कायद्याअंतर्गत 02 किसेस 1610/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
➡️ जुगार कायद्यांतर्गत एकूण 05 केसेस 2,137,60/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे म पोहे का कल्पना गिरी, पोहे का मिलिंद जवंजाळ, पोहे का नवाज शेख, पोहे का गजानन इंगळे, संजय वराडे, पो का विनोद भोजने, सुनील सपकाळ, शकील तडवी, यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments