Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारु व जुगार कायद्यांतर्गत कारवाई तसेच एनडीपीएस अश्या धडक कारवाया करण्यात आल्या.

नांदुरा. प्रतिनिधी... देवेंद्र जयस्वाल.


आज दिनांक 20/05/2025 रोजी नांदुरा पोलीस स्टेशन कडून एनडीपीएस कायद्यांतर्गत तसेच दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेले कारवाई माहिती खालील प्रमाणे.......

➡️एनडीपीएस कारवाई... आज रोजी बातमीदाराकडून बातमी मिळाली की

Nh 53 हायवे रोडवरील बाबा भोलेनाथ हॉटेल समोर सार्वजनिक ठिकाणी एक इसम गांजासारखा अमली पदार्थ चिलम मध्ये भरून पीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून छापा कारवाई केली असता आरोपी नामे जनार्दन परशुराम जुमडे वय 54 वर्ष राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा हा शासन प्रतिबंधित केलेल्या अमली पदार्थ (गांजा) चिलम मध्ये भरून पिताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध एनडीपीएस कायदा लम 8 (क),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

➡️दारूबंदी कायद्यांतर्गत केलेली कारवाई.,..

1. चावडी चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे शुभम सदाशिव वनारे वय 25 वर्ष राहणार पंचवटी नांदुरा खुर्द याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 18 नग शीशा किमती 650 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

2. सुभाष चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे केशव रवींद्र काळे वय 25 वर्ष राहणार खुमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90ml च्या 26 नग शीशा किमती 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

➡️ जुगार कायद्यांतर्गत कारवाई....

1. ग्राम निमगाव बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे महादेव नारायण जुमडे वय 35 वर्ष राहणार नारायणपूर तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

2. उस्मानाबाद चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे साबीरखान करीन खान वय 42 वर्ष राहणार शांतीनगर नांदुरा याचे विरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

3. सुभाष चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे संतोष उर्फ बाळू भगवान रुमाले वय 45 वर्ष राहणार वडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

4. मीहानी चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुभाष सुपडा इंगळे व 46 वर्ष राहणार गांधी चौक नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 2050 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

➡️ आज रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण 02 कारवाई मुद्देमाल 1600 रुपये.

➡️ आज रोजी जुगार कायद्यांतर्गत एकूण 04 कारवाई 3700 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनी बांगर, सफो मिलिंद जवंजाळ, पोहे का प्रमोद चिखलकर, पोहे का मोहदिन सय्यद, पो का कैलास सुरडकर,धनंजय वेरूळकर, रवींद्र झगडे, अनिल गोराने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments