खामगाव (सोपान पाटील)
मागील सोमवारपासून ते आज गुरुवारपर्यंत तहसील कार्यालय परिसरातील तसेच प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागात फेरफटका मारीत असताना गोरगरीब जनतेच्या अन्नधान्याची वितरणाची जबाबदारी असलेलं पूर्ण विभाग म्हणजेच रेशन विभाग या कार्यालयात गोंधनापूर येथील रेशन दुकानदार इराफत नामक व्यक्तीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या साठी असलेल्या खुर्चीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातील रेशन संबंधित आलेल्या लोकांना बाबू असल्याचा भासवित या विभागात काम करीत असल्याचा दिसून आलेला आहे
याविषयी आज रेशन ग्राहक म्हणून चर्चा केली असता त्यांनी बाबूगिरी संबंधित पत्र वरिष्ठ अधिकारी आल्यावर ते घेतील असे पत्र आम्हाला घेता येत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांची वाट पहावी असे या बनावट बाबू रेशन दुकानदार यांनी सांगितले
त्यामुळे पुरुषांनी विभागाचा ताबा रेशन दुकानदाराच्या हातात गेला असल्याचं दिसून आले आहे
संबंधित इराफत नामक दुकानदारा विषयी माहिती घेतली असता गोधनापूर या गावांमध्येही ग्राहकांना या व्यक्तीकडून त्रास असल्याची माहिती मिळाली आहे
पत्रकारांना पाहताच ठोकली धूम
तहसील कार्यालय मधील पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर बसलेला गोंधनापूर येथील इराफत नामक रेशन दुकानदार त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार फोटो काढत असतानाच तात्काळ खुर्चीवरून उठत पळ काढला उडवा उडवीचे
थातूरमातूर उत्तर देण्याचे काम
इराफत करीत होता पत्रकार असल्याचे समजतात कार्यालयातून त्यांनी निसटता पाया घेतला


Post a Comment
0 Comments