Type Here to Get Search Results !

कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या सुचनेनुसार अवैध दारू व जुगार कायद्यांतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे.

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या अवैध दारु व जुगार कायद्यांतर्गत लगातार कारवाया.

दिनांक 23/05/2025 व दिनांक 24/05/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा तर्फे अवैध दारू व जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई माहिती खालील प्रमाणे.....

 दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई....

1. दिनांक 23/05/2025 रोजी मोतीपुरा नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे प्रदीप नारायणलाल जयस्वाल वय 55 वर्ष राहणार वार्ड नंबर १० मोतीपुरा नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 25 नग शिष्या किमती 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

2. दिनांक 23/05/2025 रोजी खैवाडी, नांदुरा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मंगेश श्रीराम बुरुकले वय 34 वर्ष राहणार अंबादेवी गड खैरवाडी,नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची ताब्यातून बॉबी संत्रा देशी दारू कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 14 नग शीशा किमती 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

3. दिनांक 24/05/2025 रोजी हॉटेल लक्ष समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नरेंद्र जनार्दन धुरेंदर व 31 वर्ष राहणार दहिवडी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई करून त्याच ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 23 नग शीशा किमती 850 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

4. दिनांक 24/05/2025 रोजी राज अंडा सेंटर समोर मलकापूर रोड नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गजानन बळीराम लताड वय 55 वर्ष राहणार दुर्गा नगर नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 16 नग शिषा किमती 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

नमूद आरोपीता विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण 04 केसेस मुद्देमाल 2810/-रुपये....

जुगार कायद्यांतर्गत कारवाई.....

1. दिनांक 23/05/2025 रोजी ग्राम दहिगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे विजय अशोक जवरे वय 44 वर्ष राहणार दहिगाव तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगार साहित्य एकूण किमती 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोस्ट नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स. फौ मिलिंद जवंजाळ, स. फौ. पृथ्वीराज इंगळे,पोहे का काशिनाथ जाधव, म पोहे का कल्पना गिरी, पो का विनोद भोजने, सुनील सपकाळ यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments