गुटखा विक्रेत्यांवर माना पोलिसांचा दणका – शहर पोलीस आणि FDA गप्प का?
अकोला-अमरावतीतूनच गुटखा रॅकेट चालतंय, आणि इथल्या दलालांच्या पाठबळावरच सर्व चालू!
मूर्तिजापूर – गुटखा विक्रीवर बंदी असूनही मूर्तिजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात गुटखा खुलेआम विकला जातोय. शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन फक्त पाहुण्या भूमिकेत! कारवाई नाही, हलचल नाही – आणि गुटखा माफिया मात्र दिवसेंदिवस बिनधास्त!
याच्या नेमक्या विरुद्ध भूमिका घेत माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी 24 मे रोजी माना फाट्यावर मोठी कारवाई करत गुटखा व अमली पदार्थ वाहतूक करणारा अब्दुल रईस अब्दुल सईद (रा. मोमीनपूरा) याला अटक केली. त्याच्याकडून 38 गुटख्याची पॅकेट्स (₹25,250), 108 किलो भांगेच्या गोळ्या (₹30,550) आणि ऑटो रिक्षा (₹1,50,000) असा एकूण ₹1.78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पो.नि. सुरोशे, उपनिरीक्षक गणेश महाजन, पोहेकॉ. उमेश हरमकर, पोकॉ. मंगेश पवार यांनी केली.
पण प्रश्न हाच — बाकीचं यंत्रणा काय करते आहे?
शहर पोलीस गप्प, अन्न व औषध प्रशासन गप्प – आणि गुटखा विक्री मात्र जोमात!
अकोला आणि अमरावती हेच गुटखा रॅकेटचं मूळ केंद्र.
इथूनच साठवणूक, वाटप, वितरण आणि पैसे गोळा होतात. मूर्तिजापूरसारख्या छोट्या ठिकाणी साठा येतो म्हणजे मुख्य सूत्रधार कोठे बसले आहेत हे स्पष्ट आहे.
जनतेतून रोष वाढतोय:
"फक्त माना पोलीस लढणार का?",
"शहर पोलीस आणि FDAला कुणाचं वरदहस्त आहे का?",
"सगळ्या यंत्रणा गुटखा माफियांच्या ताटात खाऊन गप्प बसल्या आहेत का?"
हा खेळ थांबायला हवा. नाहीतर उद्या संपूर्ण विभाग गुटख्याच्या विळख्यातून बाहेर येऊ शकणार नाही.

Post a Comment
0 Comments