*डॉ आंबेडकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न*
*जळगांव जामोद प्रतिनिधी*
जळगांव जामोद. डॉ आंबेडकर विद्यालयातील एसएससी (ssc)2001-2002 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विद्यालयात विध्यार्थी स्नेह मेळाव्या चे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्यध्यापक व्ही टी भारसाकळे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस जोत्सना उगले व आशा तांगडे यांनी स्वागत गीताने केली सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन माजी विध्यार्थ्यांनकडून सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांमधून अमोल घाटे, सोनाली बावस्कार, मोहन इंगळे ,अनिल ढोकणे, संजय कोथळकर प्रतिभा इंगळे, माधुरी भड रेणुका उगले, प्रमोद तानकर, संध्या दांडगे, इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींचा उलघडा व्यक्त करून विद्यालयातून मिळालेल्या नैतिक मूल्य, शिस्तीचे, तसेच शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. त्यानंतर शिक्षकांमधून या बॅचचे वर्गशिक्षक के. ओ. इंगळे यांनी बॅचमधील विद्यार्थ्यांनी 2002 मध्ये लावलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर पर्यवेक्षक पी.पी. भागवत, डी.व्ही इंगळे माजी शिक्षक,एम. आर .विखे, एस. पी. तिजारे व सौ. आर. पी.आमले मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्हीं. टी. भारसाकळे यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार आसोलकर व शुभांगी वाघ यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रकांत मंडवाले यांनी केले अनुराधा सातव हिने आभार प्रदर्शन केले कार्यक्रमास शिक्षकांमधून एन.व्ही. वानखेडे, टी. एम.पाचपोर, एम. बी पवार, तर शिक्षकेतर कर्मचारी राम इंगळे,अरुण चव्हाण, गजानन अवचार, हिरालाल राजपूत यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयास सुमारे दहा हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम विद्यालयास भेट वस्तू दिली. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता श्याम क्षीरसागर, किशोर शेगोकार, योगेश इंगळे ,निलेश तायडे प्रल्हाद वायझोडे इत्यादींनी परिश्रम घेतले

Post a Comment
0 Comments