Type Here to Get Search Results !

उत्तरप्रदेश च्या अंतरराष्ट्रीय रक्त दाता सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील शतक पार केलेले रक्तदान विर अक्षय कुमार तेलतुंबडे यांचा सन्मान

 *उत्तरप्रदेश च्या  आंतरराष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव  येथील शतक पार केलेले रक्तदान वीर अभयकुमार तेलतुंबडे यांचा सन्मान


 माळवाडगाव    : दुधीनगर, सोनभद्र, उत्तप्रदेश येथे आंतरराष्ट्रीय रक्तवीर व विरंगना यांचा सन्मान सोहळा पार पडला असून या सन्मान सोहळ्यात मुठेवाडगाव येथील सुपुत्र  शंभराहून अधिक रक्तदान  केलेले रक्तवीर श्री.अभयकुमार तेलतुंबडे यांचा पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    नुकताच जानेवारी मध्ये त्यांचा दरभंगा बिहार येथेही आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे ते साधारण 1990 पासून रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत. साईसेवा आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवार आणि शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून ते अहोरात्र समाजसेवा आणि रुग्णसेवेच काम करतात. आतापर्यंत त्यांनी 122 वेळा स्वतः रक्तदान केले आहे.कोरोना काळात तीनही लाटेत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सर्वतोपरी मदत तन मन धनाने स्वतः च्या वाहनाने घरचे जवळ येत नसतानाही रुग्णांना औषधउपचार मिळवून दिले,तसेच अवयव दान, देहादान,याच्या प्रचार प्रसाराच काम करतात, थलेसेमिया, सिकलसेल, या सारख्या  गंभीर आजरासाठी ही ते काम करतात. रुग्णांना शासकीय मदत मिळवून देने तसेच गावोगावी रक्तदान शिबीरे घेणे, यासाठी जनजागृती करने या सारखे समाजउपयोगी  योगदान करत आले आहेत 

        मुठेवाडगाव येथील रहिवाशी असलेले अभयकुमार तेलतुंबडे यांना आतापर्यंत कोटा (राजस्थान )भतींडा (पंजाब )अलिपूरद्वार (पश्चिम बंगाल ), दरभंगा (बिहार ) या चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे . आणि हा त्यांचा पाचवा राष्ट्रीय पुरस्कार आहे.आणि शंभरच्या वर विविध संस्थाचे पुरस्कार  देशभरातील विविध राज्यातून मिळाले आहेत संपूर्ण गावकरी व रक्तदान परिवाराच्या वतीने या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

   या ही कार्यक्रमात भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले तेथेही त्यांनी आपलें 122 वे रक्तदान  पूर्ण केले 


           कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार भूपेश चोबे (सोनभद्र ), श्रवनसिंग गोंड कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत श्री. अमोल भाऊ पावसे, गोपालसिंग पुर्बा, विनोद राजपूत,दिपककुमार महाथा, रणजित मिश्रा, ललित शास्त्री,नेपाळचे रक्तमित्र जनक खडका आणि संपूर्ण नेपाळ टीम महेश पाटीदार भानूसिंग चौहान, सोनू जसवानी खामगावचे गौ रक्षक  रक्तदाते सुरज यादव, मिनू मोदी, मनीषा तिरणकर,आदी हजर होते

       पुरस्कार घेऊन आल्यानंतर  सर्वत्र त्यांचे अभिनन्दन व शुभेच्छा यांचा वर्षाव होत आहे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन,सदस्य, तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच साईसेवा रक्तदान ग्रुप व मुठेवाडगाव रक्तदान ग्रुपचे कार्यकर्ते यांनी त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा  दिल्या आहेत, तसेच अस्तगांव (राहता ) येथील रक्तमित्र श्री. नंदकुमार नळे यांनी साईचरित्र पारायण सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments