नांदुरा . प्रतिनिधी
गाडी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की कारमधील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी पत्रा कापण्याकरिता दोन तास मेहनत करावी लागली. कार मधील पथकाने कारमध्ये उतरून सर्वांना बाहेर काढले. जखमींना खामगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.
जिल्ह्यातील मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा बायपासजवळ मंगळवारी पहाटे जवळपास चार ते पाच वाजेच्या दरम्यान ट्रक आणि कारमध्ये झालेल्या या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तर चार जण गंभीर झाले आहेत. अत्यंत भीषण अशा अपघातामधील जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे
त्यांची प्रकृतीदेखील गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समोर आली असून, देवराम गंगाराम पवार (वय ६०), बबिता देवराव पवार (वय ५५), निकेतन देवराव पवार (वय २६) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व मृतक हे लोकरवाडी, ता. माहूर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. या अपघातामध्ये कारचा अक्षरचा चेंदामेंदा झाला आहे, समोरचा भागाचा चुराडा झाला आहे. घटनास्थळी नांदुरा पोलिस तातडीने दाखल झाले व त्यांनी बचाव व मदतकार्य राबविले, त्यांना ओम साई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी सहाय्य केले. चालकाला लागलेली डुलकी व भरधाव वेग यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता असून, पोलिस पुढील नांदुरा तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments