Type Here to Get Search Results !

अतिव्रूष्ठी मुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे करून तत्काळ शासनाने मदत करावी तहसीलदारांना प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन.

तेल्हारा :- उप संपादक आशिष वानखडे

 तालुक्यातील सर्व गावांमध्ये जोरदार पाऊस येऊन अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेला आहे 132 वर्षाचा रेकॉर्ड मोडला असून या पावसाने शेतकऱ्यांचे उडीद मूंग भुईमूग केळी तीळ जवारी या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे भुईमूग जवारीला तर कोंब फुटलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे अशा प्रकारचे निवेदन प्रहार च्या वतीने देण्यात आले . महाराष्ट्र शासनाने जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सुद्धा मिळाली नाही अशा अवस्थेत बळीराजाचा वाली कोण शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी तेल्हारा तहसील वर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु महासचिव राजेश पाटील खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे शेतकरी तालुका अध्यक्ष गोपाल घुगड अशोकराव नेमाडे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख युवक उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे विकी मल शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात निवेदन दिले निवेदन देतेवेळी उमेश कोरडे संतोष गिरे.प्रदीप पाथ्रीकर.शिवाजी जोध .संदीप ताथोड. श्याम बोर्डे .ऋषिकेश जायले .उदित सैनी ज्ञानदेव खडसे .विष्णू खडसे विशाल बघ्घन. रणवीर काकडे. भूषण झवर. स्वप्निल कोरडे शिवाजी कोरडे शुभम मोहोड अमित इंगळे कार्तिक इंगळे शेख शारिक प्रशांत बाभुळकर ऋषिकेश खारोडे दत्ता मोडक रोहित खोपाले विनोद खडसे भानुदास जोध आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments