अकोला जिल्हा प्रतिनिधी.आशिष वानखडे.
अकोल्यात गोवंश तस्करीचा कहर; मुर्तीजापूर, बार्शीटाकळी पाठोपाठ दहीहंडा घटनांनी उघड केला खाकीचा ढिसाळपणा!
अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना सातत्याने वाढत असून, ही चळवळ चक्क खुलेआम सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे. मुर्तीजापूर आणि बार्शीटाकळी येथे नुकत्याच झालेल्या कारवायांमध्ये गोवंश तस्करी उघडकीस आली होती. या घटनांची धग अजून शांतही झाली नाही, तोच पुन्हा १६ मे रोजी दहीहंडा परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे एक चारचाकी वाहन पकडण्यात आले, ज्यामध्ये गोवंश वाहून नेला जात होता.वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरूक नागरिकांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादामुळे ही तस्करी उधळून लावण्यात आली. वाहन पलटी झाल्याने प्राणहानी टळली आणि गोरक्षकांनी दोन गायींचा जीव वाचवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली, तरी नेहमीप्रमाणे आरोपी पसार झाले.
सर्वात गंभीर बाब म्हणजे – मुर्तीजापूर, बार्शीटाकळी, दहीहंडा अशा विविध भागांमध्ये सातत्याने कारवाया घडूनही प्रशासनाचा ठोस पवित्रा अजूनही दिसून येत नाही. जिल्ह्यात गोवंश मास खुलेआम विक्रीस उपलब्ध असल्याची चर्चा जनतेत असून, या काळ्या धंद्याच्या विरोधात सामान्य नागरिकच पुढे सरसावत आहेत. प्रशासन आणि पोलीस मात्र फक्त ‘घटना घडल्यानंतरची कारवाई’ या चौकटीत अडकले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आल्यानंतरच खालच्या स्तरावर हलवा जाणारा पोलिस यंत्रणा हा गंभीर प्रश्न बनला आहे. जनतेतून विचारले जात आहे – गोवंश तस्करी थांबवण्यासाठी शासनाकडे इच्छाशक्ती आहे का? की कुणा सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली ही तस्करी फोफावतेय?
प्रशासनासाठी हा इशारा ठरावा – जनतेचा संयम सुटतोय, आता कृती हवी, केवळ पंचनामे नाहीत!
क्राईम अपडेट न्युज करीता आशिष वानखेडे(अकोला)

Post a Comment
0 Comments