भांबेरी गावातील नागरिकांनी केले दनोरी गावाचे कौतुक*
आशिष वानखडे
अकोला
तेल्हारा- तालुक्यातील भांबेरी येथील अंकित महादेव भोजने या युवकाचे दनोरी गावातील दिपाली प्रेमदास पाखरे या युवतीशी ता.25 मे रोजी विवाह होता मोठ्या प्रमाणात दनोरी गावात दोन्ही कडील पाहुणे उपस्थित होते
जिल्ह्यात चक्रीवादळ व पाऊस मोठ्या प्रमाणात येत असून जवळजवळ मे महिण्यातील लग्न यावेळी चक्रीवादळ आणि पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत यामुळे वधू-वरासह पाहुणे मंडळीची सुद्धा दाना दान उडाली आहे अंकित भोजने यांच्या विवाहाच्या दिवशी जिल्हयांसह दनोरी गावात सुद्धां मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ व पाऊस आल्याने विवाहाला गेलेल्या 2 ते 4 महिण्याच्या लहान मुलांसह, वृद्ध, महिला,पुरूष याच्यावर सुद्धा पळापळीची वेळ आली असती मात्र दनोरी गावातील सुजाण पुरुष व महिलांनी सामाजिक सलोखा कायम करून जातीपातीचा भेदभाव न करता आपल्या घरात घेऊन भोजनासाठी बसविले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर शेळके यांनी चांगल्या प्रकारे पाहुणे मंडळीला सहकार्य केले दनोरी गावातील पुरुष, महिला व युवक यांनी मानवी समाजात एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल भांबेरी येथील नागरिकांनी दनोरी गावाचे कौतुक करून जाहीर आभार मानले

Post a Comment
0 Comments