शिवपालन रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अकोट मध्ये शेतकऱ्यांची मोटरसायकल रॅली.
(अकोट ) प्रतिनिधी निलेश वानखडे
तालुक्यातील शिव पानंदरस्ते व ईतर इतर मागण्याकरता प्रा.अरुण हिंगणकर आणि बंडू बोरोकार यांच्या नेतृत्वाखाली शिवपानंद रस्ते समिती च्या वतीने संतोषी माता मंदिर दर्यापूर रोडपासून ते तहसील कार्यालय पोपटखेड आकोट पर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली.व नंतर माननीय तहसीलदार साहेब यांच्यावतीने नायब तहसीलदार नरेंद्र सोनोने यांनी निवेदन स्वीकारून त्या त्याबाबतीत शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली .त्यामध्ये प्रामुख्याने (१)ग्राम स्तरावर समित्या दहा दिवसाच्या आत गठीत करण्याचे निर्देश द्यावे.(२)प्रतेक गावातील शिवपानंद रस्त्याला नंबर देण्यात यावा(३) अतिक्रमण केलेले किंवा बंद झालेले रस्ते पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर मोकळे करण्याबाबत (४) शेतकऱ्यांच्या बाबतीत वैयक्तिक शेत रस्त्याच्या समस्या सोडवण्याबाबत. वरील समस्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोडण्यात येतील असे आश्वासन माननीय नरेंद्र सोनोने साहेब यांनी शेतकऱ्यांना दिले. त्याकरता खालील सदस्य उपस्थित होते. प्रा. अरुण हिंगणकर ,(समन्वय प्रमुख)बंडू बोरोकार, प्रदीप गावंडे ,लक्ष्मण व्यवहारे ,श्याम गावंडे ,कैलास गिरी. , प्रदीप हिंगणकर, पप्पू गावंडे ,विलासराव गावंडे ,सचीन काळे, मिलिंद लांडे , सुनील बाळे,विलास घाटोळ ,सचिन अंबळकार, अरविंद हाडोळे ,झुल्फिकार अली,अमीत नाथे , सुनील काठोळे, वैभव गुजरकर ,अनंत रावणकार, विलास हिंगणकर , धनंजय बोरोळे ,संजय पांडे ,अनिल उबाळे, वामनराव नारे, ईत्यादी शेतकऱ्यांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments