कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी – मा. विलास पाटील सर
नांदुरा शहरातील नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने भाग्यवान आहेत की, येथे मा. विलास पाटील सर यांच्यासारखे कर्तव्यदक्ष, कणखर आणि संवेदनशील पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. सरांनी नांदुरामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
सरांचा जनतेशी संवाद कायम सकारात्मक असतो. नागरिकांचे प्रश्न ते धीराने ऐकतात आणि त्यावर त्वरित कार्यवाही करतात. त्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत अनेक अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती, आणि असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई केली आहे, त्यामुळे शहरात एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शिस्त, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा या तीन तत्त्वांवर आधारित त्यांचं कार्य पद्धत ही अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला केवळ दबावाचं यंत्र न ठेवता, समाजाभिमुख आणि सहकार्यशील बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
नांदुरा शहर त्यांचं नेतृत्व लाभल्याबद्दल नक्कीच अभिमान बाळगतो. अशाच प्रकारे त्यांच्या कार्याची पताका सतत उंचावलेली राहो, हीच शुदिच्छा!
शुभेच्छुक युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी आझाद पठाण,



Post a Comment
0 Comments