नांदुरा.प्रतिनीधी
नांदुरा पोलिसांकडून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य धंद्याविरुद्ध कारवाईचे सत्र नियमित सुरू असून आज दिनांक 15/05/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली ग्राम कोळंबा येथील रईस बेग यांचे प्लॉटिंग मध्ये काही लोक 52 ताश पत्त्याचा एका बादशाह नावाचा जुगाराचा खेळ पैशाच्या हार जित वर खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने नमूद आरोपीतांविरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपी नामे 01. विशाल मोहन जवरे वय 38 वर्ष रा खुदावंतपुर ता नांदुरा
02. समीर खान युनुस खान वय 21 वर्ष नवाबपुरा
03 , शेख शाख शेख कासम वय 30 वर्ष रा खाजा नगर ता नांदुरा
04. मोहम्मद वसीम मोहम्मद इलियास क्य 37 वर्ष रा ताज नगर नांदुरा
05. मोहम्मद अमिन शेख इस्माईल वय 46 वर्ष रा टिचर कॉलोनी शेगाव जि बुलडाणा
06. साबीर बेग अहेमद बेग वय 55 वर्ष रा कोळंबा ता नांदुरा यांना ताब्यात घेऊन त्यांचें ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 1,50,580 रु चा जुगार मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.

Post a Comment
0 Comments