पिंपळगाव राजा येथे ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक; अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
खामगाव (ता.14 मे):सोपान पाटील
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरात एका नऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला अटक करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे कार्य केले आहे.
ही धक्कादायक घटना काल दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास पिंपळगाव राजा येथील पेठपुरा भागात घडली. रेहान खान मुक्तार खान (वय २२, रा. पेठपुरा, पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) या युवकाने अत्याचार केल्याचे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला सायंकाळी पाचच्या सुमारास माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि त्यांच्या पथकाने विलंब न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन केवळ काही तासांतच त्याला नांदुरा रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले.

Post a Comment
0 Comments