पोलीस स्टेशन नांदुरा
आज दिनांक 10/05/2025 रोजी चे 11/30 वा ते 12/00 वा दरम्यान पोलीस स्टेशन नांदुरा येथे पो.नि.श्री विलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली मीटिंग दरम्यान. महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
*सर्व पोलीस पाटील यांनी आपले चार्ज मध्ये असलेले गाव येथे कुठल्याही प्रकारचा अवैध पुतळा बसणार नाही याची दक्षता घ्यावी.
*सर्वांनी आपले गावांमध्ये सकाळी गुड मॉर्निंग गस्त घालावी व आपले गावांमधील पुतळे मंदिर चेक करावे.
*आपले गावातील काही कायदा व सुव्यवस्था असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन नांदुराशी संपर्क करावा.
*काही जातीय स्वरूपाच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा व माहिती द्यावी.
*धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असल्यास गोपनीय विभागाशी तात्काळ संपर्क साधावा व संबंधितांना पोलीस स्टेशन नांदुरा येथे जाऊन भेट देण्यात सांगावे.
तसेच इतर महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या दरम्यान 15 ते 16 पोलीस पाटील मिटिंग दरम्यान हजर होते.
करिता माहितीस्तव सविनय सादर.


Post a Comment
0 Comments