**नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मॉकड्रिल राबवला कार्यक्रम
गुलशेर शेख
स्थानिक दुसरबिड
आज दिनांक 11 मे 2025 रोजी दुसरबीड येथे नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नागरी संरक्षण मॉकड्रिल कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख *मार्गदर्शक म्हणून श्री विनोद नरवडे साहेब ठाणेदार किनगाव राजा हे उपस्थित होते त्यांनी* नागरी संरक्षण व मॉकड्रिल कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बदलत्या परिस्थितीमध्ये तरुणांनी निर्व्यसनी असणे खूपच महत्त्वाचे आहे आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण व्यसनाधीन होत चाललेला आहे तसेच प्रसार माध्यमांच्या आहारी जात आहे त्याबाबत सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नागरे सर व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी समरोपीय कार्यक्रमांमध्ये युद्धजन्य परिस्थितीवर प्रकाश टाकत असताना आपण युद्ध करत नसून आपण फक्त दहशतवाद्यांच्या बरोबर लढत आहोत आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय आपला देश माघार घेणार नाही असे ठणकावून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे या कार्यक्रमासाठी विज्ञान महाविद्यालय मलकापूर येथील प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील प्राध्यापक डॉक्टर रमेश परिहार प्राध्यापक अंकुश गोतरकर प्राध्यापक डॉक्टर दीपक झोपे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक देवानंद नागरे प्राध्यापक सत्यम श्रीवास्तव प्राध्यापक मिलिंद गवळी प्राध्यापक महेश कांदे श्री गजानन मुंडे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते





Post a Comment
0 Comments