सोलापूर धुळे एम एच 52 महामार्गावर प्राणांतिक अपघात
गुलशेर शेख .
आज दिनांक 19/05/2025
*रोजी सकाळी 08.30 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्ग NH 52 सौंदलगाव शिवार कार क्रमांक MH 20 सीएस 44 22 चा चालक अमरदीप बाबुराव चव्हाण हा धुळे सोलापूर महामार्गाने छत्रपती संभाजी नगर कडून बीड कडे जात असताना सौंदलगाव शिवार शिव सम्राट हॉटेल च्या जवळील वळण रस्ता वर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी अनियंत्रित होऊन रोडच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडक देऊन पलटी होऊन अपघात झाला आहे त्यामध्ये एक महिला व एक लहान मुलगी मयत झाली आहे व एक एक महिला गंभीर जखमी आहे व चार जण किरकोळ जखमी आहे
*
* मयताची नावे1) रोहिणी अमरदीप चव्हाण वय 32 वर्ष राहणार टिळक नगर एन 4 सिडको संभाजी नगर 2) नूरवी अमरदीप चव्हाण वय अडीच वर्षे मुलगी
*
* गंभीर जखमी
* कमलबाई बाबुराव चव्हाण वय 65 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर
किरकोळ जखमी चालक 1) अमरदिप बाबुराव चव्हाण 2) प्रदीप बाबुराव चव्हाण 3) रुद्राक्ष प्रदीप चव्हाण वय दोन वर्ष 4) विश्रांती प्रदीप चव्हाण वय 29 वर्षे सर्वांना छत्रपती संभाजीनगर मयत यांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले तसेच गंभीर जखमी कमलबाई बाबुराव चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले किरकोळ जखमी यांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले
सदर अपघातास प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत HC/438 बर्ले, HC/922 बिरकायलु, Npc/143 जगधने, PC/1402 बेडेकर अपघात स्थळे भेट देऊन अपघाताची पाहणी केली सदर अपघात हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेला आहे.
प्रभारी अधिकारी
रामदास निकम
पोलीस उपनिरीक्षक
म. पो. पोलीस केंद्र जालना



Post a Comment
0 Comments