अंबरनाथ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणी पालकांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित .
प्रतिनिधी, अंबरनाथ येथील साई व कानसई विभागातील दहावी व बारावीच्या परीक्षेत नुकतेच यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सन्मान सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.नगरसेवक कुणाल भोईर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कुमारी.दुर्वा दिक्षा शैलेश सोनावणे,सिंड्रेला इंग्लिश मिडीयम स्कूल बदलापूर या शाळेच्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८८% गुण प्राप्त केले आहे.कुठलेही कोचिंग क्लास न लावता अथक परिश्रम घेऊन हे गुण प्राप्त केले आहे. हे सर्व गुण मिळवणे माझी आई व माझे शिक्षक किरण सर,मोनिशा टीचर,मीना धुरी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अपेक्षा मॅम यांच्या मार्गदर्शना मुळे शक्य झाले असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.विद्यार्थिनीचे पालक हे सामाजिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत आहेत.आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशन च्या संचालिका दिक्षा शैलेश सोनावणे ह्या सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला भारत सरकारच्या रक्षा मंत्रालया कडून राजपथ, नवी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले होते तसेच विविध समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवत असताना विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. विजय इंगळे,मोहन पैठणकर,भागवत खैरनार, अजित मोडक,मंदार दिघे, विवेकानंद सोनावणे,विमल सोनवणे, हर्ष सोनावने तसेच प्रज्ञा प्रेरणा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रकाश शिंदे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.मा.नगरसेविका अपर्णा भोईर यांनी उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment
0 Comments