पोलीस स्टेशन नांदुरा
आज दिनांक 08/04/2025 रोजी 19.10 वा ते 19.30 वा पोलीस स्टेशन नांदुरा येथे मटन विक्रेते यांची मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये त्यांना दिनांक 10/04/2025 महावीर जयंती दिनांक 12/04/2025 रोजी हनुमान जयंती निमित्त मटन/चिकन विक्रीचे दुकाने बंद ठेवावे. तसेच नेहमी करिता उघड्यावर मटन विक्री करू नये. समोरून दुकानावर पडदा लावावे. बाबा सूचना करून मार्गदर्शन केले. मीटिंग करिता 10 मटन विक्रेते हजर होते. त्यांना कलम 168 बी एन एस एस प्रमाणे नोटीस तामील केल्या आहे.
तसेच नांदुरा शहरातील दर्गा अध्यक्ष सदस्य यांची 19.35 ते 20.15 वा पावेतो मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये त्यांना दर्गा ची खबरदारी म्हणून खालील प्रमाणे उपाय योजना राबवणे बाबत सांगितले.
1. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षा समिती नेमावी.
2. धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही बसून घ्यावे.
3. रात्रीचे वेळी धार्मिक स्थळांचे दरवाजे बंद करून कुलूप लावून घ्यावे.
4. धार्मिक स्थळ उघडे असल्यास भिंत बांधून घ्यावे.
5. सुरक्षा समिती पैकी एक व्यक्ती त्या ठिकाणी हजर ठेवावे.
6. योग्य ती साफसफाई ठेवून धार्मिक स्थळांची काळजी घ्यावी.
बाबत मार्गदर्शन केले. सदर मीटिंग करिता 05 दर्गाचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते. त्यांना कलम 168 प्रमाणे नोटीस तामील केली आहे.

Post a Comment
0 Comments