Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या दारू विक्रेत्यांवर लगातार ‌धडाकेबाज कार्यवाही

आज दिनांक 05/05/2025 रोजी मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवायाची माहिती खालील प्रमाणे...


1. ग्राम सावरगाव नेहू तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुरेश तुळशीराम खराटे वय 60 वर्ष राहणार सावरगाव नेहू तालुका नांदुरा याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू कोकण संत्रा 999 कंपनीच्या 90 एम एल च्या 16 नग शीशा किमती 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच

2. जनता चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे शैलेश भास्कर भगत व 29 वर्ष राहणार नवी येरळी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायदे अंतर्गत कारवाई करून त्यांच्या ताब्यातून देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या 90 एम एल च्या 30 नग शिशा किमती 1050 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सदरची कारवाई श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस ठाणे नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स.फौ निंबोळकर, पोहे का मिलिंद जवांजळ, पोहे का अमोल खोंदिल,पो का विनोद भोजने, योगेश निंबाळकर यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments