Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील पोलिस स्टेशन नांदुरा यांच्या जुगार व दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई

दिनांक 05/04/2025 व दिनांक 06/04/2025 व दिनांक 07/04/2025 रोजी अवैद्य दारू व जुगार कायद्यांतर्गत पोलीस स्टेशन नांदुरा तर्फे करण्यात आलेल्या कारवाई माहिती खालील प्रमाणे.... *

दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई 

1. दिनांक 05/04/2025 रोजी ग्राम शेलगाव मुकुंद तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राजेंद्र हरिभाऊ वानखडे वय 40 वर्ष राहणार शेलगाव मुकुंद तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या एकूण 12 नग सीलबंद शीशा किमती 500 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

2. दिनांक 06/04/2025 ग्राम वाडी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे यादव शंकर खंडारे वय 65 वर्ष राहणार वाडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून हातभट्टीची पाच लिटर दारू किमती  550/- रुपय मुद्देमाल जप्त करण्यात आला.

3. दिनांक 07/04/2025 ग्राम नायगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे दिलीप दशरथ सपकाळ वय 40 वर्ष राहणार नायगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल च्या 10 नग शिशा किमती 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमूद आरोपीतानविरुद्ध दारूबंदी कायदा कलम 65ई प्रमाणे कारवाई करण्यात आली.

 *जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई**

1. ग्राम अलमपूर तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून  दिनांक 06/04/25 रोजी आरोपी नामे अमोल एकनाथ वानखेडे वय 35 वर्ष राहणार कुरा काकोडा तालुका मुक्ताईनगर 2. अश्विन सुनील बगाडे व 20 वर्ष राहणार आलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांच्या ताब्यातून नगदी रुपये जुगाराचे साहित्य तिथली भवरा बोर्ड असे एकूण किमती 1200/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच 

2. दिनांक 06/04/25 रोजी ग्राम चांदुर बिस्वा बस स्टँड येथे आरोपी नामे प्रल्हाद उत्तम कठाडे वय 35 वर्ष राहणार चांदुर बिस्वा तालुका नांदुरा यांच्या विरुद्ध जुगार कायद्यांदर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण किमती 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

3. दिनांक 06/04/25 रोजी ग्राम अलमपूर येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे श्रीराम सुपडा भाटे वय 45 वर्ष राहणार आलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य तिथली भवरा बोर्ड  एकूण किमती 1000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

नमूद आरोपी ता विरुद्ध कायदेशीर कारवाई करून 12 अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

सदरची कारवाई श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा यांचें सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स. फौजदार संजय निंबोलकर,पोहे का मिलिंद जवंजाळ, अमोल खोंदिलं, प्रमोद चिखलकर, उमेश भारसाकळे,पोना विक्रम राजपूत, पॉका शकील तडवी, विनोद भोजने, विनायक मानकर, आकाश भुलनकर, जगन्नाथ खैरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments