*नांदुरा शहरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा भक्तीभावात संपन्न !*
नांदुरा : देवेन्द्र जैसवाल
शहरातील भगवान महाविर मार्ग, मारवाडी गल्लीतील माहेश्वरी पंचायत श्री बालाजी मंदीर येथे रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी पारंपारीक रित्या श्रीराम जन्मोत्सव सोहळा संस्थान चे वतीने संपन्न झाला.
सायंकाळी ५ वाजता श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती चे वतीने श्री बालाजी मंदीर येथे महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रसंगी मा.आ. राजेशभाऊ एकडे यांचे शुभहस्ते विधीवत श्रीरामपुजन करून महाआरती करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख लालाभाऊ ईंगळे,जगदीश आगरकर, सुरेशदादा पेठकर, श्रीधर बुरकले, अमित गादीया, आषिश बुरकले,शाम डंबेलकर, यांचे सह जयश्रीराम प्रभातफेरी चे गिरीशसेठ चांडक, प्रफुलभैय्या राठी,मनमोहन चांडक,शामभाऊ पांडे, महेशकुमार पांडे, लढ्ढाजी,यांनी आपल्या अमृतमय वाणीद्वारा शंखध्वनी व टाळमृदुंर्गाचे गजरात प्रभुश्रीराम आरती संपन्न झाली. सारीकाताई डागा, सरीताताई बावस्कार, लताताई ठोंबरे यांचेसह अनेक माताभगिनी, रामभक्त श्री बालाजी मंदीरात ऊपस्थीत होते.
त्यानंतर नांदुरा शहराचे पारंपारीक महामार्गावरून ,,भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला होता.
यामध्ये श्री तानाजी व्यायामशाळा खामगांव च्या बालमुलींचे मल्लखांब पथकाने नेत्रदिपक कसरती दाखऊन प्रेक्षकांची दाद मिळविली, तसेच विघ्नहर्ता महीला ढोलताशा पथक, नांदुरा (खुर्द) यांनी देखील ऊकृष्ठ कलात्मक पारंपारीक वाद्यतंत्राचा अवलंब करून ,,हम भी कुछ कम नही !,, हे दाखऊन दिले.
मिरवणुक मार्गावर अनेक रामभक्त कुटुंबियांनी आपआपल्या अंगनात पाणी शिंपडुन रंगबिरगी रांगोळ्या काढुन वातावरण मंगलमय केलेले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोषण आगरकर, राजेश पालकर, नरेश पेठकर, देवेन जैस्वाल,गजानन डंबेलकर, विष्णु क्षिरसागर,गोपाल नेमाडे, यांचेसह जय श्रीराम बहुऊद्देशीय सेवा समिती सदस्य व रामभक्तांनी परीश्रम घेतले. रात्री १० वाजता शोभायात्रा सोहळ्याची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments