*मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून; मोहपाणी गावात खळबळ*
*अकोला जिल्हा प्रतिनिधी* *आशिष वानखडे*
तेल्हारा तालुक्यातील मोहपाणी गावात पैशाच्या वादातून मुलानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना १७ एप्रिल २०२५ रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.
मृतक नारसिंग तेरसिंग जमरा (वय ७२) यांना टायगर प्रोजेक्ट अंतर्गत पुनर्वसनासाठी १३ लाख रुपये मिळाले होते. याच पैशावरून मृतकाचा मुलगा रामसिंग नारसिंग जमरा (वय ४१) याने कुर्हाडीने वार करून त्यांचा निर्घृण खून केला.
ही माहिती उमरशेवळी येथील फिर्यादी मोहन नवलसिंग जमरा (वय २६) यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १७ एप्रिल रोजी दुपारी १२.४७ वाजता दाखल करण्यात आला.
पोलीसांनी तत्काळ मोहपाणी गावात जाऊन आरोपीला अटक केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड चे ठाणेदार गजानन राठोड, उपनिरीक्षक श्रीराम जाधव, उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, अंनता मुळे व पो.कॉ. जवरीलाल जाधव, प्रमोद भोंगळ, आकाश गजभार यांनी केली.
सदर घटनेमुळे मोहपाणी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास पुढे सुरू आहे.


Post a Comment
0 Comments