जिल्हा प्रतिनिधि. सचीन अंबादास जगदाळे
खामगाव शहर दिनांक 17/04/2025
खामगाव येथील तहसीलदार
सुनील पाटील व तलाठी शैलेश बाठे यांचा अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठिंबा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणारांना पाठिंबा. शासनाने प्रशासनाचे प्रतिमा मलिन करण्याचे काम. खामगाव तहसील येथे घडत आहे
ग्राम शेलोडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे सुरू असलेले अवैद्य स्टोन क्रेशर. अवैध उत्खनन सुरु आहे तरीपण तहसीलदार सुनील पाटील गाढ झोपेत का?
तक्रारदार - सचिन अंबादास जगदाळे
(केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ तालुका अध्यक्ष)
यांनी दिनांक 09/04/2025/रोजी खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांच्या कडे ग्राम शेलोडी तालुका खामगाव येथे सुरू असलेली अवैध स्टोन क्रेशर. व अवैध उत्खनन करणाऱ्या विरुद्ध तक्रार दिली होती पण तहसीलदार साहेब यांनी आजपर्यंत ही कुठल्याही प्रकारचे स्थळ निरीक्षण केले नाही व कारवाई सुद्धा केली नाही. तहसील खामगाव तलाठी शैलेश बाठे. यांनी गैर अर्जदार (1) गजानन प्रल्हाद बानाईत (2)मनोज गजानन बानाईत (3)प्रमोद गजानन बानाईत (4)रेखा गजानन बानाईत. यांची सुरू असलेल्या विनापरवाना स्टोन क्रेशर बद्दल वारंवार लेखी अहवाल तहसीलदार सुनील पाटील यांना सादर केलेले आहेत तरीपण कारवाई का होत नाही असा भला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
गैर अर्जदार यांनी. शासनाने दिलेल्या परवानापेक्षा जास्त उत्खनन केलेले आहे सोबतच कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा स्टोन क्रेशर सुद्धा चालवीत आहे. खामगाव तहसील येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चिरीमिरी करून शासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम गैरअर्जदार करीत आहेत






Post a Comment
0 Comments