शेतकरी नवरा नको पण त्यांच्या घरी शेती हवी
अकोला जिल्हा प्रतिनिधी .आशिष वानखडे
काही दिवसांपूर्वी समाजात वराचे पारडे जड असायचे.हुऺडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यत मजल जायची आता बदलत्या काळानुसार मुलींची संख्या कमी घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे सध्या चक्र पलठने असुन.आम्हाला हुंडा नको.लग्नाचा खर्च आम्ही करतो.फक्त तुमची मुलगी हवी.अशी म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे . निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीचे वाईट दिवस आले आहे.त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी समाधानने नांदावी अशीच आशा असते सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधू पित्याची नजर कमावत्या मुलांकडे वळली आहे.त्यादुष्टीने वधू पिता मुलांसाठी शोध मोहीम राबविण्यात असल्याचे दिसून येत आहे.पण शेतकरी पित्याचे मुलगी असो किंवा नोकरदार पित्याची मुलगी सर्वंच शेतकरी मुला कडे दुर्लक्ष करत आहे.पुर्वी मुला मुलींच्या लग्नाचा बार उडवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबास आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळवण्याकरीता आर्थिक प्रयत्न करावे लागत आहे.मुलाकडील मंडळी लग्नाचा. सर्व खर्च करायला तयार होत आहेत.अकोला जिल्ह्यात अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होवुनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता पस्तीसी पार गेलेली दिसुन येत आहे.अकोला जिल्ह्यातील विशेषतः अनेक गावांतील तरुण मंडळी मागील 3ते4 वर्षांपासून लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.मुलगी मिळत नसल्याने शोध मोहीम सुरू आहे.नोकरीवाल्या मुलाचे जमते.मात्र उच्च शिक्षण असुनही काही कामधंदा लागला नाही.म्हणुन सोयरीक जुळताना अडचणी येत आहेत.यातच वय वाढत चालण्याणे लग्नाविना राहण्याची वेळ येते की काय अशी भिती तरुणांना वाटत आहे.मुलीची घटती संख्या याला कारण आहे.

Post a Comment
0 Comments