*भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्थेमध्ये स्व. ॲड. दिनेश ओं. जुनगडे साहेब यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन साजरा* .
भारतीय ज्ञानपीठ संकुलामध्ये आज दि 13/04/2025 रोजी भारतीय ज्ञानपीठ संस्थेचे मा. सहसचिव तथा मार्गदर्शक स्व.ॲड दिनेशजी ओंकार जूनगडे यांचा चौथा पुण्यस्मरण दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम या दिवसा निमित्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य यांनी साहेबांच्या पावन स्मृतीस उजाळा दिला.यावेळी संस्थेचे संचालक व आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री निलेशजी ( बबलू भाऊ) जुनगडे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाकरिता विद्यालयातील सर्व विभागाचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते .सर्वांच्या वतीने साहेबांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन व आदरांजली अर्पण करण्यात आली.

Post a Comment
0 Comments