Type Here to Get Search Results !

समृद्धी महामार्गावर प्रणांतिक अपघात

गुलशेर शेख 





आज दिनांक 27/04/ 2025 रोजी दुपारी 01 .20 वाजेच्या दरम्यान माहिती मिळाली की समृद्धी महामार्ग चैनल नंबर 370/560 नागपूर कॉरिडोर निधोना शिवार या ठिकाणी अपघात झाला म्हणून ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे सोबत पोलीस अमलदार खराडे बक्कल नंबर 1589 महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड , मनोज राठोड, मवई व लहू जाधव असे तात्काळ घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता कार क्रमांक MH 48P 2085 टोयाटो कंपनीची फॉर्च्यूनर चा चालक अमर प्रजापति त्यांची पत्नी सुनिता अमर प्रजापति व मुलगी पायल मुंबई वेस्ट असे हे सदर वाहनाने संभाजीनगर कडून नागपूरकडे जात असताना चायनल नंबर 370/ 560 निधोना शिवार येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर कार ही ड्रायव्हर साईड उजव्या बाजूला बॅरीगेटला घासत जाऊन डाव्या साईटला चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकून पलटी झाली त्यामध्ये सुनिता अमर प्रजापती यांना गंभीर मार लागून मयत झाल्या मुलगी पायल ही पण गंभीर जखमी झाली त्यांना तात्काळ समृद्धीवरील क्यू आर व्ही व आर पी व्ही यांच्या मदतीने बाहेर काढून समृद्धीवरील अंबुलन्सने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून सदर अपघातग्रस्त वाहन हे हायड्राच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे सदर वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नव्हते 

 प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली

Post a Comment

0 Comments