प्रबोधनात परिवर्तनाची ताकद असल्याने सेवा संघाने प्रबोधनाचा मार्ग निवडला- सौरभदादा खेडेकर
( नांदुरा येथे जिजाऊ रथयात्रेचे भव्य स्वागत )
पुरोगामी महाराष्ट्रातील बंधूभाव संपत आहे. जाती-जातीत क्षुल्लक कारणांवरून तेढ निर्माण होत आहे. एकमेकांच्या सुख-दु:खात धावणार्यांच्या मनात विष कालवले जात आहे. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे असून यासाठीच मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले असून द्वेषाचे वातावरण संपवत बंधूभाव निर्माण करण्याची ताकद प्रबोधनात असल्याने सेवासंघाने प्रबोधनाचा मार्ग निवडल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे सौरभदादा खेडेकर यांनी नांदुरा येथे रथयात्रे प्रसंगी केले.
नांदुरा येथे २० एप्रिल रोजी मराठा सेवासंघ प्रणित मराठा जोडो अभियानातंर्गत आयोजित जिजाऊ रथयात्रेचे उत्स्फूर्तपणे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी ह.भ.प. रामभाऊ झांबरे यांच्या मार्गदर्शनात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तर राजेश गावंडे व वामनराव भगत यांच्या मार्गदर्शनात मामुलवाडी येथील शाळेचे शिक्षकही सहभागी असलेले लेझीम पथक सदर दिंडीचे आकर्षण ठरले. सदर रथयात्रा नांदुरा येथील विश्रामगृहावरून मधुबन चौक, गांधी चौक, उमंग चौक, छत्रपती शिवराय पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मोठा हनुमान आदी ठिकाणी रथयात्रेचे सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सौरभदादा खेडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषभाऊ पेठकर यांच्या हस्ते हारार्पण करून सदर ठिकाणी सौरभदादा खेडेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सौरभदादा खेडेकर यांच्यासह सुभाषराव कोल्हे, बलदेवराव चोपडे, संतोष डिवरे, यशभैय्या संचेती, माजी आमदार राजेश एकडे, सुधीरमुर्हेकर, जयश्रीताई शेळके, हभप रामभाऊ महाराज झांबरे, लाला इंगळे, भगवान धांडे, सुनिल जुनारे, प्रमोद हिवाळे, प्रमोद खोंड, अनिल जांगडे, अजय घनोकार, सिमाताई ठाकरे, सारीकाताई डागा, अरूणाताई पेठकर, कोमलताई तायडे, ज्योतीताई तांदळे, सुनयनाताई अढाव, अर्चनाताई कान्हेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदर दिंडीला पाणी व शरबतचे वाटप माजी आमदार राजेश एकडे, गणेश मांजरे, हभप रामभाऊ महाराज झांबरे, जगदीश आगरकर, रामेश्वर वानखेडे (आप्पाजी), सुनिल मोहनानी, सचिन वेरूळकर, दुर्गानंद वाघमारे, डॉ.सागर अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, शैलेश चिंचोळकर, महेश मोहनानी, नरेश हरगुणानी आदींसह अनेकांच्या वतीने वितरीत करण्यात आले.
सिंधी समाजासह अनेक समाजाच्यावतीने रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आल े. रथयात्रा यशस्वीतेसाठी सुभाषभाऊ पेठकर व सहकारी, मराठा पाटील युवक समिती नांदुरा, जिजाऊ- सावित्री विचारमंच, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, समविचारी संघटनांनी सहकार्य केले.
संचलन अक्षय बोचरे तर आभार प्रदर्शन विष्णू बाठे यांनी केले
या रथयात्रेला बंडूभाऊ मुकुंद व परिवार तसेच बाळासाहेब पवार अलंकार आणि परिवार यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करून करण्यात आलेले स्वागत नांदुरा शहरात चर्चेचा विषय ठरले.


Post a Comment
0 Comments