आज दि . 03/04/2025 व दिनांक04/04/2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलीस स्टेशन नांदुरा तर्फे करण्यात आलेल्या अवैद्य दारू व जुगार विरुद्धच्या कारवाया खालील प्रमाणे
दारूबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आलेली कारवाई
1. दिनांक 03/04/25 रोजी ग्राम खुमगाव बुरटी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे विजय महादेव काळे व 37 वर्ष रा खुमगाव बुरटी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू बॉबी संत्रा कंपनी सीलबंद 90 एम एल च्या 19 नग शिक्षा किमती 700 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
2. दिनांक 04/04/2025 रोजी मिळाल्या माहितीवरून ग्राम वडनेर भोलजी येथे आरोपी नामे भास्करराव निळकंठ राव देशमुख वय 75 वर्ष राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून कोकण संत्रा देशी दारू 999 कंपनीच्या 180 एम एल च्या दहा नग शीशा किमती 750 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुगार कायद्यांतर्गत कारवाई
1. दिनांक 03/04/25 रोजी रेल्वे स्टेशन चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सनाउल्ला खान सहित खान वय 54 वर्ष राहणार राखुंडे पुरा नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
2. दिनांक 03/04/25 रोजी मधुबन चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुनील बुलचंद आहूजा वय पन्नास वर्ष राहणार सिंधी कॉलनी नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 1350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच
3.दिनांक 03/04/25 रोजी ग्राम हिंगणे गव्हाड येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे रवींद्र शिवसिंग हळदे व 41 वर्ष राहणार हिंगणे गव्हाड तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी रुपये व जुगाराचे साहित्य एकूण किमती 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
4. दिनांक 04/04/2025 रोजी मिळालेल्या माहितीवरून ग्राम हिंगणे गव्हाळ येथे आरोपी नामे निलेश प्रभुनाथ गव्हाळ वय 52 वर्ष राहणार हिंगणे गव्हाळ तालुका नांदुरा कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी रुपये व जुगाराचे साहित्य एकूण किमती 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपीतां कडून एकूण 2850 रुपयाचा जुगार मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सफो संजय निंबाळकर,पोहे का मिलिंद जवंजाळ, पोहे का प्रमोद चिखलकर, पोहे का अमोल खोंदील, पोना विक्रम राजपूत, पोका धनंजय वेरूळकर, विनोद भोजने, विनायक मानकर, रवींद्र झगडे यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments