*पहेलगाम येथील निष्पाप नागरीकांचे हत्येचे निषेधार्थ नांदुरा शहर व्यापारी महासंघाचा बंद !*
👉🏽 *रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजे पर्यंत बंद राहील !!*
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे फिरायला गेलेल्या निष्पाप २७ पर्यटकांना पाकधार्जीन्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या व त्यांचा निष्पाप बळी घेतला . त्यांचे हे राक्षसी कृत्य सरळ भारताच्या धर्मनिरपेक्षतेला चिथावणी देण्याचे षडयंत्र आहे . पण आम्ही त्यांच्या या कृत्याला थारा देणारे नाहीत . आम्ही सर्व एक आहोत . सर्व प्रथम आम्ही भारतीय आहोत .
तेव्हा त्या मृत पर्यटकांच्या प्रती संवेदना म्हणून रविवार दि . २७ / ४ / २०२५ रोजी नांदुरा शहरातील सर्व व्यापारी बांधव दुपारी २.०० पर्यंत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवत आहोत . तसेच या स्वयंस्पूर्त बंद च्या माध्यमातून आम्ही नांदुरा व्यापारी - व्यावसायिक भारत सरकारच्या समर्थनार्थ उभे आहोत .
🇮🇳 जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
*नांदुरा शहर व्यापारी महासंघ, नांदुरा*
टिप : मेडीकल, भाजीबाजार, दुध विक्री अशी जीवनाश्यक दुकाने बंद मधून वगळलेली आहेत.

Post a Comment
0 Comments