*क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी*
नांदुरा : *महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त नांदुरा शहरामध्ये भव्य शोभायात्रा आणि मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते* . *सर्वप्रथम संत श्री सावता माळी भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत श्री सावता महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि शोभायात्रा आणि मोटार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली . शहरातील विविध मुख्य चौकांमध्ये समाजसेवी संघटना , संस्था आदींची वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले . महात्मा जोतीराव फुले यांच्या शोभायात्रा आणि मोटारसायकल रॅलीला शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला . शोभायात्रेच्या रथात क्रांतीसुर्य जोतीराव फुले यांच्या वेशभूषात असणारा चि . अंश नंदकिशोर जुमडे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषात असणारी कु . ईशिता नितीन सातव यांनी सर्व उपस्थितीचे लक्ष वेधून घेतले .शोभायात्रा आणि मोटार सायकल रॅलीच्या यशस्वितेसाठी क्रांतीसुर्य महात्मा जोतीरात फुले सार्वजनिक जयंती समिती ,विविध समाजसेवी संघटना तसेच शहर आणि ग्रामीण भागातील सर्व बंधू आणि भगिनींनी परिश्रम घेतले .

Post a Comment
0 Comments