Type Here to Get Search Results !

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदुरा पोलीस स्टेशन येथे शांतता समिति बैठक संपन्न

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि ११एप्रिल २०२५रोजी नांदुरा पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते 

या बैठकीला पोलीस अधिकारी,महावितरणचे अभियंता,नगर परिषद चे अधिकारी, तहसील कार्यालयाचे अधिकारी , शांतता समितीचे सदस्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक समितीचे अध्यक्ष, सदस्य यांच्यासह पत्रकार बंधु तसेच शहरातील विविध जाती धर्माच्या प्रतिष्ठित नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मीटिंग दरम्यान खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.

1) मिरवणूक वेळेवर सुरू करून वेळेवर संपवणे. 

2) ध्वनी प्रदूषण नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे. 

3) वाद्य गाणे वाजविताना कोणत्याही धर्माचे विटंबना होणार नाही. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे. 

4) आयोजक व शांतता समिती सदस्य हे मिरवणुकीमध्ये मिरवणूक संपेपर्यंत सोबत राहील. 

5) मिरवणुकीमध्ये झेंड्याला लोखंडी रॉड तसेच मोठे झेंडे राहणार नाही. 

6) मध्य प्राशन करून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाही याची आयोजक यांनी दक्षता घ्यावी.

बाबत सूचना करून मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments