अवधा :नांदुरा.... सोपान पाटील
अवधा देवी येथे पारधी टाकोनकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री वळेखन माऊलीचा यात्रा, महोत्सव तपस्वी संत धर्मगुरू स्वर्गीय दासफुले महाराज विदर्भव्यास पुरस्कार प्राप्त यांच्या प्रेरणेने १२ व १३ एप्रिल रोजी आयोजित केला आहे.
यामध्ये १२ एप्रिल रोजी सकाळी ७वाजता आरती, दुपारी १२.३० ते २ वाघरी बोलीभाषा प्रचार व प्रबोधन, दुपारी २.३० ते ६ सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, सायंकाळी ६ ते रात्री ९
महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजतापासून पुढे परसंग गायन, खुळ भजन व अखंड माउली जागरण, १३. एप्रिल रोजी सकाळी ६.३० आरती, ८ वाजता अल्पोपहार व समापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करावे, असे आवाहन विश्वस्त / सल्लागार व यात्रा उत्सव समिती श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्थान अवधा खुर्द यांचेवतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments