नांदुरा/प्रतिनिधी...देवेन्द्र जैसवाल
आशा वर्कर हे आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या कामामुळेच आज ग्रामीण भागासह शहरी भागातील आरोग्यसेवा बळकट झाली आहे.असे प्रतिपादन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी केले आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी शहरातील टाऊन हॉल येथे आयोजित आशा दिवस कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
आशा स्वयंसेविका यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी आशा दिवन साजरा करण्यात येत असतो.त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा पाटील व आशा तालुका समन्वयक मंगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनात दिनांक २ एप्रिल रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला.यामध्ये आशा वर्कर यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली,वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशाचा सत्कार करण्यात आला,तसेच विविध स्पर्धा घेऊन त्यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक घेणाऱ्या आशांना प्रमाणपत्र देण्यात आले.यामधे रांगोळी स्पर्धा,प्रश्नमंजुषा,गीत गायन, भारूळ,एकांकिका,अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आशा वर्कर ह्या उन्हातान्हात घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देत असतात म्हणून उन्हाच्या दिवसात त्यांना पिण्याच्या पाण्याची खूप आवश्यकता असते म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्नेहा पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना पाणी बॉटलचे वाटप केले.
यावेळी भाजपचे गजानन मोहन शर्मा,गजानन चरखे,शैलेश मिरगे तसेच प्रा.आ.केंद्र नांदुरा चे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरदोस मॅडम,डॉ.किशोर घाटे,डॉ. ज्ञानेश्वर खोद्रे,लेखापाल अनिल सोनूने,संदीप सपकाळ,लसीकरण पर्यवेक्षक संतोष तायडे, कनिष्ठ लिपीक श्रीमती फिरके,डॉ.खिल्लारे मॅडम,डॉ. गव्हाळ मॅडम,ज्ञानेश्वर लोढे,प्रदीप राजनकर, झीशान खान तसेच सर्व आशा गटप्रवर्तक व शेकडो आशा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय घन,लक्ष्मी खानचंदानी,हर्षल इंगळे,श्री सुनील बोंद्रे,सिद्धार्थ वाकोडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय भोपळे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश खर्चे यांनी केले.




Post a Comment
0 Comments