महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल..
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीतून राबविल्या गेलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात कामगार विभागाने प्रथम क्रमांक मिळवला..
कामगार मंत्री मा.श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विभागाने अतुलनीय कार्य करत महाराष्ट्रातील कामगारांच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. शासनाच्या स्थापनेला 100 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच मिळालेल्या या यशाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी कामगार विभागाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत कामगार मंत्री मा.श्री. आकाशदादा फुंडकर यांचे विशेष अभिनंदन केले.
ही केवळ सुरुवात आहे..महाराष्ट्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि हक्कांसाठी शासन नेहमी कटिबद्ध राहील.

Post a Comment
0 Comments