*जिगांव येथील २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!*
नांदुरा.. सोपान पाटील
तालुक्यातील जुने जिगाव येथे २४ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. विशाल तुकाराम पिवळतकर (वय २४, रा. जुने जिगाव) याने आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. फिर्यादी गजानन शिवाजी पिवळतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नांदुरा पोलिसांनी घटनेची नोंद करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अंतर्गत मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय निंबोळकर करीत आहेत......

Post a Comment
0 Comments