आज दिनांक 16/04/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार व ओपी चांदुर बिस्वा चे निमगाव बीट अंमलदार तसेच पोस्ट स्टॉप अंमलदार यांनी नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाने करण्यात आलेल्या कारवया
नांदुरा येथील ताज नगर गेट येथे इसम नामे गणेश सदाशिव वेरूळकर वय 43 वर्ष रा. नांदुरा खुर्द ता.नांदुरा यांच्या ताब्यातून वरली मटक्याचे नगदी रुपये 325/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरून महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही मा पो नि सा यांचे मार्गदर्शन मध्ये पोहेका मिलिंद जवंजाळ ,नापो राहुल ससाने , विनोद भोजने, रवी झगरे, सुनील सपकाळ यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments