Type Here to Get Search Results !

कुछ कनिष्का बावने एस्पायरिंग यंग साइंटिस्ट अवार्ड 2025 ने सम्मानित

 कु कनिष्का बावणे एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड 2025 ने सन्मानित

पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण


मुंबई (प्रतिनिधी ) डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन 2024-2025 या वर्षीचा एस्पायरिंग सायंटिस्ट अवार्ड 2025 यावर्षी . के .डी इंग्लिश हायस्कूल नांदुरा ची विद्यार्थिनी कु कनिष्का भाऊसाहेब बावणे हिला देण्यात आला आहे मुंबई येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोमवार दिनांक 21 एप्रिल 25 रोजी the aspiring young scientist award 2025( द एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवार्ड 2025 ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पद्मभूषण पुरस्कार प्राप्त तसेच आय सी टी मुंबई,भुवनेश्वर, जालना चे 

चान्स लर जयेश भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी जोशी यांच्या हस्ते कुमारी कनिष्का भाऊसाहेब बावणे हिला अल्फा एस्पायरिंग सायंटिस्ट अवार्ड 2025 हा पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे डॉ होमीभाभा फाउंडेशन च्या वतीने सन 24-25 या वर्षी घेण्यात आलेल्या विज्ञान परीक्षेत कनिष्काही एक लाख 39 विद्यार्थ्यांमधून वर्ग आठ मधून महाराष्ट्रातून प्रथम आलेली होती. नेहमी शाळेत हुशार असणारी कनिष्का ही के. डी इंग्लिश हायस्कूल नांदुरा ची विद्यार्थिनी असून या वर्षी वर्ग आठ मधून ती प्रथम आलेली आहेच पण संपूर्ण स्कूल मधून सुद्धा ती टॉपर आहे.या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना कु कनिष्का बावणे हिने या पुरस्काराचे सर्व श्रेय तिचे माता पिता तसेच के. डी.इंग्लिश हायस्कूल च्या संस्थापक श्रुती नथानी मॅम प्रिन्सिपॉल कविता राजपूत मॅम, स्नेहा बेंद्रे मॅम, कराडे मॅम,माधुरी मॅम,राणे मॅम,सोनाली मिहानी मॅम, सोनल नवगजे मॅम उप प्राचार्य गौरव गायकवाड सर, यांच्या सह सर्वच स्टाफ चे आभार मानत भविष्यात सायंटिस्ट होण्याचा मनोदय तिने व्यक्त केला फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थी यांना सायंटिस्ट घडविण्या करिता मोलाचे मार्गदर्शन करण्यात येते भविष्यात कनिष्का बावणे हिला सुद्धा तिचे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे फाउंडेशनच्या वतीने सुनील सुनील कुलकर्णी अस्मिता फातिमा शेख यांनी सांगितले पुढील वर्षी इस्रो च्या ट्रिप करिता कनिष्काला बंगलोर येथे फाउंडेशनच्या वतीने इस्रो स्टेशन ला भेटी करिता नेण्यात येणार असल्याची माहिती या वेळी दिली.मुंबई येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments