Type Here to Get Search Results !

हिंदी भाषा शक्तिचा नियम मागे घ्या मनसेची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब याना निवेदन पाठवण्यात आले

नांदुरा. देवेन्द्र जैसवाल 


हिंदी भाषा शक्तीचा नियम मागे घ्या मनसेची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन पाठवण्यात आली महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने राज्यशालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार येता पहिलीपासून हिंदी भाषेत तृतीय भाषेचा स्वरूपात सक्तीची शिकवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत मराठी व इंग्रजी बरोबर हिंदी ही तृतीय भाषा शक्तीने शिकवावी लागणार आहे तसेच अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा हिंदी मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकविल्या जाणार आहेत सदर निर्णयाची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या जून 2025 पासून सुरू होणार आहे या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदी ही भाषा सक्तीची करू नये यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले शहराध्यक्ष सागर जगदाळे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे अजय बेलोकार सचिन अंधारे शिलानंद वाकोडे अमोल करूटले अभिषेक खेतकर यांनी निवेदन दिले

Post a Comment

0 Comments