Type Here to Get Search Results !

‌‌आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कठोर कारवार्ई , श्री विलास पाटील पोलिस निरीक्षक नांदुरा

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच नांदुरा पोलीस स्टेशन चे वतीने नियमितरीत्या सोशल मीडिया व प्रिंट मीडिया व प्रत्यक्षपणे जनजागृती करून सोशल मीडियाद्वारे कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये की ज्यामुळे सामाजिक, धार्मिक एकोपा बाधित होईल, परंतु तरीसुद्धा काही विकृत बुद्धीचे इसमांकडून नियमितरीत्या पोलिसांद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन न करता सोशल मीडिया द्वारे आक्षेपार्य पोस्ट व्हायरल करताना दिसून येत आहे अशीच एक घटना घडली आहे, दिनांक 22 /03/2025 रोजी नांदुरा तालुक्यातील बुरटी या गावातील एका युवकांनी त्याचे इंस्टाग्राम वर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी बुद्धी परस्पर वाईट उद्देशाने आक्षेपाह्या फोटो व मजकूर प्रसारित केला होता सदर पोस्ट सोशल मीडिया वरून सायबर पोलीस स्टेशन द्वारे डिलीट करण्यात आली असून पोस्ट व्हायरल करणारे युवकाविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुण्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदर आरोपीचे क्राईम रेकॉर्ड बघता गंभीर स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

  तरी आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा याद्वारे पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणतेही व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे जातीय, सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करणारी व सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचवणारी पोस्ट व्हायरल करू नये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप, इत्यादी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा व त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सुज्ञ नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे, सायबर विभागातर्फे अक्षेपाहर्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत असून त्यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तडीपारी, एम.पी.डी. ए, मोकका, यासारख्या गंभीर स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक कारवाया सुद्धा वेळप्रसंगी करण्यात येणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.


Post a Comment

0 Comments