Type Here to Get Search Results !

पंधरा दिवसापासुन चांदुर बिस्वा येथे तलाठीच नाही

 पंधरा दिवसापासून चांदूर बिस्वा येथे तलाठीच नाही!

नांदुरा.... सोपान पाटील . उप संपादक.

चांदूर बिस्वा हे नांदुरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून महसूल मंडळाचे गाव आहे तसेच मंडळ अधिकारी कार्यर्यालय व तलाठी कार्यर्यालय चांदूर बिस्वा येथे आहे चांदूर बिस्वा येथील तलाठी श्री झोटे हे गेल्या पंधरा दिवसापासून तलाठी कार्यर्यालयात हजर नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना सातबारा उतारा विद्याथ्यांना लागणारे शालेय दाखले तसेच वृद्ध व्यक्तींना लागणारे दाखले अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची कागदपत्रे सादर करणे आधी सर्व कामे ठप्प झाली

आहे त्यामुळे चांदुर बिस्वा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे तलाठी श्री झोटे हे जेवढे दिवस कार्यालय आले तेवढे दिवस दारू पिऊन आले नागरिकांसोबत असभ्य वर्तन करणे आदी गंभीर तक्रारी आहेत तरी श्री झोटे यांची बदली करून येथे तात्काळ नवीन तलाठी रूजू करण्यात यावे अशी मागणी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. किशोर अशोकराव जाधव यांनी मा. तहसीलदार नांदुरा यांचे कडे केली आहे निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा, विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments