*140 गावांना क्षारयुक्त पाणी; किडनीचे 83 रुग्ण आढळले खंडित पाणी पुरवठ्याने किडनीचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे*
*संग्रामपूर* सोपान पाटील का. संपादक........
संग्रामपूर तालुक्यातील थकीत पाणीपट्टी देयकापोटी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाइलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यात किडनीचे वाराण्याची शक्यता निर्माण झाली आहते. मागील कित्येक वर्षापासुन निमगांच्या अवकृपेने आदिवासी बहुत असलेल्या संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याला खारपान पटवाचा शाप लागला आहे. या दोन्ही तालुक्यात बहुतांश ठिकाणी गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे ग्रामस्थांना कितीतरी वर्षे क्षारयुक्त पाणी प्यावे लागत
होते. परिणामी अनेक ग्रामस्थांना किडनीच्या आजाराने प्रासून टाकले होते. आतापर्यंत या आजारामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. सध्यास्थितीत तालुक्यात ८३ किडनीप्रस्त रुण आहेत. या आजारांपासून ग्रामस्थांची सुटका व्हावी, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांसाठी १४० गाव पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. वाण धरणातील गोड पाण्याचा नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे. परंतु थकीत बिलापोटी जीवन प्राधिकरण विभागाने बावीस गावांचा १३ पेल्लुवारीपासून पाणीपुरवठा बंद केला आहे. त्या पैकी ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरल्यामुळे तेथील
पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर उर्वरित पंधरा गावांची पाणीपट्टी भरणे बाकी असल्याने येथील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात अनेकांना किड़नीचे आजार होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा बंद असलेली गावे झाशी, निमखेड, मारोड, आकोली बुद्रुक, अकोली खुर्द, राजपुरा, उमरा, सायखेड, कळमखेड, निरोड, काकोडा, मोमीनाबाद, काटेल, आवार, उकळी बुद्रक या १५ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. अकोला पाटबंधारे विभागाने ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र जोवन प्राधिकरण विभागाला पत्र पाठवून १५ फेब्रुवारीपर्यंत थकीत
पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले होते. हनुमान सागर धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठ्याचे डिसेंबरच्या अखेरीस १ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपयांचे देयक भरणे आवश्यक आहे. या रकमेचा भरणा न झाल्याने १५ फेब्रुवारीपासून चकीत गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने तेथील नागरिकांना गोड्या पाण्यापासून बंचित राहावे लागत आहे. वान धरणाच्या थकीत पाणीपट्टी रक्कम भरण्यासंदर्भात अकोला पाटबंधारे विभागाकडून पत्र प्रात झाले असल्याने तालुक्यातील १३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेल्या २२ गावांपैकी काही थकबाकीचा भरणा करणाऱ्या ७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत
सुरू करण्यात आला आहे. इतरही ग्रामपंचायतने थकीत पाणीपट्टी भरून सहकार्य करावे. इंदल राठोड, उपविभागीय अधिकारी म.जि. प्रा. जळगाव जामोद

Post a Comment
0 Comments